h3.post-title, .comments h4 { font-family: 'Ek Mukta', Regular; font-size: 28px; } आदर्श विवाह : आजची आवश्यकता - मराठी विश्व

आदर्श विवाह : आजची आवश्यकता

हिंदू संस्कृतीच्या सोळा संस्कारांपैकी विवाह सुध्दा एक मानव जीवनाचा संस्कार आहे. फ़ार जुन्या श्रीस्वेतकेतुच्या( सामाजिक कार्यकर्ता ज्याने विवाहाची पध्दती पहिल्यांदा सुरू केली. )पिढ्यानपिढ्या प्रचलित असलेल्या भारतीय संस्कृतीच्या धार्मिक अनुष्ठानाचा आणि कालान्तराने धर्म-विधीचे एक स्वरूप प्रकटलेल्या विवाहाबद्दलच्या पवित्र कल्पनाच आपण धुडकाऊन लावल्या आहेत.
विवाह हा पती-पत्नीचा पवित्र संबंध आहे ज्यास आपण 'परिवार' नावाने संबोधितो. कुटुंब नंतर जाती,समाज आणि विभिन्न समाजातुन एक राष्ट्र निर्माण होते . आता तर विवाहाने समाजाच्या विकासाची महत्वपुर्ण भुमिकाच घेतली आहे.
विवाह पध्द्ती विभिन्न प्रदेशाच्या स्थानीय परिस्थितीनुसार बनली. रितीरिवाजामध्ये सुध्दा भिन्नता आहेच . परंतु सर्वांचा एकच उद्देश्य असतो तो म्हणजे वधु -पिता सुयोग्य वर पाहून काही विशिष्ट धार्मिक विधीने कन्या वराला अर्पण करतो व मिळालेला उपहार स्वरूप पैसा, अन्न , वस्त्र, भांडी वगैरे कन्येच्या स्वाधीन करतो. जेणेकरून नवनिर्मित परिवारास तात्पुरत्या निर्वाहाची व्यवस्था सुलभ होईल. या सर्व कल्पनाच आपण वेशीवर टांगल्यात. आता तर विवाह म्हणजे आर्थिक देवाण-घेवाण जसे हुंडा, भव्य वराती, पार्ट्या आणि त्यात विभिन्न प्रकारचे आडंबर असाच झाला आहे.
वर्तमान स्थितीत विवाह पध्दतीच इतक्या विकृतींनी जकडत चालली आहे की, मोठी रक्कम व सामुग्री तोंडाने मागुन सामुहिक भोजन, बँड-बाजे,फ़टाके, नाचणे, गाणे, मद्यप्राशन इत्यादि सर्वसाधारण बाब बनली आहे .या थोथांडाच्या विचारधारेने तर दिवसेंदिवस विभिन्न जातीसमाज खोखला होत आहे व त्यातच लोकसंख्येची वाढ, साधनांची कमतरता, आर्थिक क्षमता तर दिवसेंदिवस कमी होत आहे. दिखावटी गर्व व मोठेपणा दाखविण्याकरिता स्वत:च्या कुवतेच्या बाहेर अमाप खर्च हा तर विवेकहिनतेचाच एक परिचय आहे. कर्ज घेऊन विवाह सोहळा साजरा करणे भावी पिढीच्या विकासात धोंडे ठेवल्या प्रमाणेच आहे. आपण स्वत:च्या धनाची असल्या प्रकारची खेदस्पद उधळण करायला हवी का? खर्च करायचाच झाला तर विशिष्ट रचनात्मक सामाजिक आवश्यकतेनेच केल्या जावा,जेणेकरून आपले स्वत:चे उत्तरदायित्व पुर्ण व्हायला हवे.
आदि कालापासून आपण या रूढींनी इतके जकडलेली आहोत की तिला त्यागण्याची चेष्टाच करू पहात नाही. वर पक्ष आपले हात नेहमीच उंच ठेवतो तर दुसरीकडे वधु-पक्ष या हिनतेचे सावज बनतो. पालकवर्ग तर नाहीच पण आजचा तरूण वर्ग तरी या विरूध्द बंड करतो काय? "व्यक्तिस्वातंत्र्यतेचा" फ़ायदा घेणा-या तरूणांनी तरी ही असल्या प्रकारची जळमटं डोक्यातुन झटकली आहेत काय? ही मूल्य तरूणांच्यात न येण्याचं कारण म्हणजे मुख्यत्वे आमची अगोदरची पिढीच जबाबदार आहे. गरीब काय किंवा श्रीमंत काय? मुलांचे वा मुलींचे सर्व निर्णय पालकच घेत असतात. ती मोठी झाली आहेत, त्यांनी आता स्वतंत्र विचार करायला हवा;आपली निजी जबाबदारी समजायला हवी ह्याची थोडी तरी कल्पना पालक करीत नाही. कुटूंबाची,पालकांची प्रतिष्ठा सांभाळण्याचे एकमेव कार्य फ़क्त त्यांचेवर सोपविलेले असते. या बाबतीत आम्हीच आपल्या पुढल्या पिढ्या बरबाद
करतो आहोत असं त्यांना कधीच वाटू नये का? श्री संत ज्ञानेश्वरांची खालील ओवी हेच स्पष्ट करते---
--एथ वडील जे जे करिती. तया नाम धर्मू ठेवीती
तेच येर अनुष्ठती. सामान्य सकळ !
(आपली वडीलधारी मंडळी जे काही करतात त्यासच आजचा तरूण वर्ग धर्म मानतात व अनुसरतात)
तरूणांनी असले बंधन तसेच पालकांनी सुध्दा असल्या प्रकारचे दांभिक विवाह्संस्कार झुगारून आज वेळेचा, पैशाचा व होणा-या त्रासापासुन बचत कण्याकरिता प्रयत्न करायला हवेत आणि ही परिस्थिती बदलायची असेल तर विवाहाबद्दलची आर्थिक चौकट समूळ नष्ट करायला हवी. ह्याची अत्याधिक आवश्यकता आहे.
ही चौकट नष्ट करताना काही नविन मूल्येही स्विकरावी लागेल व त्याकरिता अंगिकारावी लागेल 'आदर्श विवाह' पध्दती. ही पध्दती म्हणजे काय? तर दुसरे-तिसरे काही नसून अव्यवहारिक पैशांचा खर्च,आडंबर,हुंडा,होणारा त्रास या सगळ्या बाबींना झुगारून एक साधा सरळ विवाह म्हणजे आदर्श विवाह. आदर्श विवाहाची विचारधारा सर्व-साधारणांपर्यंत पोहचविण्यासाठी आतापासूनच आपण कंबर कसायला हवी अन्यथा भविष्य फ़ार गोत्यात जाईल. तरी बांधवांनो,भगिनींनो! आता तरी जागा आणि आपल्या सुखी भविष्यासाठी आदर्श विवाहाचा अंगिकार करा . तर हुंडा पध्दतीचा बिमोड नक्कीच होऊ शकेल .
मला माझ्या सर्वदूरचा काहीच विचार करायचा नाही ही तरूणांमधली वृत्ती सोडवुन संघटनांनी,संस्थांनी तरूणांना अशा आदर्श विवाह पध्दतीकडे आकर्षित करण्यासाठी तशा प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन करायला पाहिजे व पालकांनी ,तरूणांनी व तरूणींनी एका नव्या समाज क्रांतीसाठी सर्व दूराग्रह डावलून आदर्श विवाहाची परंपरा कायम करायला हवी असे मला वाटते.
Share on Google Plus

About Mridagandh

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.