h3.post-title, .comments h4 { font-family: 'Ek Mukta', Regular; font-size: 28px; } पाऊस काई पडत नाय,त्तेनं काई अडत नाय. - मराठी विश्व

पाऊस काई पडत नाय,त्तेनं काई अडत नाय.


प्रसन्नाची "पाऊस पडतच नाही" कवितेच्या शिर्षकावरून ही पावसाला उपरोधक विनोदी व-हाडी कविता सुचली. कितपत जुळली? ठाव नाय. अर्थातच हे आपण मला सांगणार आहात. होय की नाही???

काय ल्याहाव पावसाचं,            
मले काई कयत नाय.                                              
बोल्याचं त खुप काई,
पण मले काई जुयत नाय...

पाऊस काई पडत नाय,
त्तेन काई अडत नाय.

तु आली नाय, पाऊस बी. 
काय आहे नातं तुय?
थो न राह्यत एका ठायी,
पन तुह्य मले कयत नाय...

पाऊस काई पडत नाय,
त्तेन काई अडत नाय.

परसातली तुयशी सुकली,
सुकडे सारे पानं भाय.
पण माह्या कायजाचं काई?
तुले काई जडत नाय....

पाऊस काई पडत नाय,
त्तेन काई अडत नाय.

सुकलं सारं नदीचं पाणी,
सारं जीवन रेती काय?
पावसाचा त विरह बाणा,
पन तुह्य काई वळत नाय....

पाऊस काई पडत नाय,
त्तेन काई अडत नाय.

पिरती झाली तार तार,
तुह्या साठी मराव काय?
पिंजारलं काईज माह्यं,
दे माय धरणीठाय...

पाऊस काई पडत नाय,
त्तेन काई अडत नाय.

ये तु ,पावसासकट.
हिरवी होईन धरणीमाय.
पावसातच गाऊ अन न्हाउ.
पाऊसच सारं सारं, काय...

पाऊस काई पडत नाय,
त्तेन काई अडत नाय.
Share on Google Plus

About Mridagandh

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.

0 comments:

Post a Comment